Mayuri12345
@Mayuri12345
2 yr. ago
विषय - भारताची विश्र्वगुरू होण्याकडे वाटचाल
शीर्षक - भरारी

मी पाहिले,हरवून गेले ,
जेव्हा भाजप सत्तेत आले •
कमी झाले,ओझे मनाचे ,
आम्हा मुक्तीचे,भाग्य लाभले •

नवी दिशा,नवी भरारी ,
सारे काही,प्रगतशील •
आदर देव- देवतांचा ,
देश होतोय,सौजन्यशिल •

नव्या योजना,सबसिडी ,
गरिबांची,भरते झोळी •
अन्याय आणि दुष्कृत्याची ,
नेहमी होते,इथे होळी •

संविधानाचा होतो,आदर ,
लहान-थोराना,मिळतो मान •
स्त्री मुक्तीची,ज्योत पेटवून ,
नारीचा होतो,सन्मान •

जल्लोष होतो,साऱ्या जगात ,
माझ्या भारत देशाचा •
अभिमान आहे,माझा मला ,
प्रथा आणि परंपरेचा •

सौ - मयुरी मंगेश रेडीज
मू पोस्ट - घाटीवळे,तालु

No replys yet!

It seems that this Post does not yet have any comments. In order to respond to this Post from Mayuri12345 , click on at the bottom under it